‘ये ढाई किलो हात अगर किसी पे पडता है तो वो उठता नही…. उठ जाता है….’ हा डायलॉग विसरणे कोणालाही कठीणच आहे. बॉलिवूडचा ‘मस्क्यूलर’ अभिनेता म्हणजेच सनी देओल त्याच्या दमदार आजही ओळखला जातो.

वाचा : ‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन?

सनी देओलने ‘बेताब’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील त्याचा अभिनय इतका प्रभावी होता की, त्याला ‘फिल्मफेअर’ पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर अल्पावधीत स्टार झालेल्या सनीने ८०-९०च्या दशकात ‘त्रिदेव’, ‘अर्जुन’, ‘क्रोध’, ‘घायल’, ‘विश्वात्मा’, ‘लुटेरे’, ‘डर’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘बॉर्डर’ यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. ‘दिल्लगी’ या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. सनीला आतापर्यंत दोन राष्ट्रीय आणि सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट सहअभिनेता म्हणून त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय. यापैकी त्याला कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला ते तुम्हाला सांगायचे आहे.

प्रश्न : सनी देओलला कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला?
पर्याय
१. अर्जुन
२. गदर – एक प्रेम कथा
३. दामिनी

लवकरच सनी देओल ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात दिसणार आहे. श्रेयस तळपदे दिग्दर्शित या चित्रपटात सनीसह त्याचा भाऊ बॉबी देओल, श्रेयस आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. श्रेयसने निर्मिती केलेल्या ‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. नसबंदीच्या पोस्टरवर तीन सामान्य नागरिकांचा चुकून फोटो छापल्याने त्यातून होणारी विनोदनिर्मिती यात पाहावयास मिळणार आहे. तसेच, चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही देण्यात येईल.

वाचा : राज ठाकरे यांच्या मुलीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
‘पिया का घर’ कोणत्या मराठी चित्रपटाचा रिमेक होता?
उत्तर – मुंबईचा जावई