मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने नॉलेजच्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

Inside Photos : सागरिका घाटगेचा ‘मेहंदी कार्यक्रम’

magic of generative ai magic of generative technology
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञानाची कमाल
Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सौंदर्यवती म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन. कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेल्या ऐश्वर्याने आपल्या रुपाने आणि निळ्या डोळ्यांनी सर्वांनाच घायाळ केले. मॉडेलिंग विश्वातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने १९९४ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ आणि ‘मिस वर्ल्ड’ हे महत्त्वाचे पुरस्कार आपल्या नावावर केले.

प्रश्न – ऐश्वर्या रायचा पहिला चित्रपट कोणता?
पर्याय
१. इरुवर
२. और प्यार हो गया
३. जीन्स

PHOTOS : सिद्धिविनायकाच्या चरणी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर

ऐश्वर्याने १९९७ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने हिंदीसह तमिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषिक चित्रपटांमध्येही काम केले आहे. २००९ मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी विवाह केला. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ती तब्बल चार वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. त्यानंतर २०१५ मध्ये तिने ‘जज्बा’ चित्रपटाने दमदार एण्ट्री करत अजूनही ती आघाडीची अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले. लवकरच ऐश्वर्या ‘फन्ने खान’ चित्रपटात अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत दिसेल

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
‘कुछ कुछ होता है’मधील शाहरुख-काजोलच्या कॉलेजचे नाव आठवतेय?
उत्तर – झेवियर्स कॉलेज