देशभक्तीची भावना अंतर्मनातच असावी लागते. न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने त्या ठरवता येणार नाहीत, असे मत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने व्यक्त केले आहे. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला होता. तसेच केंद्र सरकारला राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी नियम बदलायचे असतील तर ध्वजसंहिता बदलण्याचा विचार करावा, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधू नये, असा सल्लाही न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभूमीवर सनी लिओनीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपले मत व्यक्त केले.

वाचा : प्रभासचे मानधन ऐकून करण जोहरची बोलती बंद!

सध्या सनी तिच्या आगामी ‘तेरा इंतजार’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिला चित्रपटागृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहावे किंवा नाही, यावरून सुरू असलेल्या वादाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सनी म्हणाली की, देशभक्ती ही एक अशी भावना आहे की, जी अंतर्मनातून निर्माण होते. त्यासाठी आतूनच काहीतरी वाटावे लागते. याबाबत न्यायालयाचा निर्णय काहीही असो, आपण राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहिलेच पाहिजे. निदान मी तरी राहते, असे तिने सांगितले. तर अभिनेता अरबाज खान म्हणाला की, राष्ट्रगीत सुरु असताना मी नक्कीच उभा राहणार. माझ्या मनात राष्ट्रगीतासाठी आदर असल्याने ते सुरू झाल्यावर मी आपसूकच उभा राहतो.

वाचा : शाहरुखचे ‘फिमेल व्हर्जन’ म्हणत सुहानाची नेटिझन्सकडून खिल्ली

गीतकार आणि लेखक जावेद अख्तर, चित्रपट संकलक आणि लेखक अपूर्व असरानी, गायक अदनान सामी, टीव्ही अभिनेता अनुप सोनी आणि इतरही काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी न्यायालयाच्या या निर्णयानंतर ट्विटरवरून आपले मत व्यक्त केले.