भारतीय टेलिव्हिजनचा असा एक काळ होता जेव्हा मालिकांना काही अर्थ असायचा. टीव्हीवर येणाऱ्या मालिका यांना अर्थ तर असायचाच शिवाय त्या मनोरंजनात्मकही असायच्या. ‘मालगुडी डेज्’, ‘सर्कस’, ‘हम पांच’, ‘हिप हिप हुर्रे’ अशा एकाहून एक सरस मालिका होत्या. पण आता अशा मालिका आल्या आहेत ज्या का आहेत हा एक मुलभूत प्रश्न अनेकांना पडतो. मालिकांच्या कथा, त्याहून कलाकारांचा भयानक अभिनय आणि अनावश्यक ड्रामा यामुळे या मालिका बघू नये असंच वाटतं. सध्या अनेक वाहिनींवर अशा अनेक मालिका आहेत ज्या तात्काळ बंद व्हाव्या अशी अनेकांची इच्छा आहे. पण त्यातही पुढील पाच मालिकांचा गांभिर्याने विचार करून त्या बंद कराव्यात अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

‘लोटा पार्टी’ला लोटा देण्याची अक्षयची विनंती

ससुराल सिमर का-
ही मालिका २०११ मध्ये प्रदर्शित झाली होती. आता या मालिकेला सात वर्ष झाली तरीही ही मालिका अजून संपायचं नाव घेत नाही. दोन बहिणींची लग्नं एकाच घरात होतात आणि मग पुढे काय होतं या कथेवर ही मालिका आधारित होती. सासू-सुनेचं जे रडगाणं इतर मालिकांमध्ये दाखवलं जात तसंच ते या मालिकेतही दाखवलं गेलं. पण मालिकेचे लेखक आणि निर्मात्यांनी एक पाऊल पुढे टाकत घरामध्ये भूत, साप यांचा शिरकाव केला. हे कमी की काय किटकांकडून कुटुंबाचा होणारा छळ या मालिकेत दाखवण्यात आला.

ये रिश्ता क्या केहलाता है-
गेल्या आठ वर्षांपासून ये रिश्ता क्या केहलाता है ही मालिका प्रेक्षकांना सहन करावी लागत आहे. या मालिकेत काहींना मारुन टाकले पण हा शो काही थांबला नाही.

साथ निभाना साथिया-
या मालिकेचे नाव बदलून गोपी बहू केलं तरी चालण्यासारखं आहे. गोपी बहू आणि तिचे कारनामे पाहून कोणतीही व्यक्ती एवढी भोळी कशी असू शकते हा प्रश्न पडतो. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नसेल जिला लॅपटॉपही साबणाच्या पाण्याने न धुण्याची गोष्ट आहे हे माहित नसेल. पण या हिंदी मालिकांमध्ये हेही होते. २०१० मध्ये सुरू झालेली ही मालिका अजूनही सुरू आहे हे आपलं दुर्भाग्य. अशी एकही गोष्ट नसेल जी या मालिकेने केली नसेल.

कुमकुम भाग्य-
एकता कपूरची निर्मिती असलेली कुमकुम भाग्य ही मालिका जेन ऑस्टिनच्या सेन्स अॅण्ड सेन्सीबिलीटी या पुस्तकावर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. पण या पुस्तकाचं आणि मालिकेचा काहीही संबंध दिसत नाही. इतर मालिकांप्रमाणेच या मालिकेमध्येही बुद्धीला न पटणारे खूप बदल करण्यात आले.

संजय लीला भन्साळी आणि सलमानचे १० वर्षांनी एकत्र

नागिन-
निकृष्ट दर्जाचं व्हीएफएक्स कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागिन ही मालिका. कथेमध्ये अतिशयोक्ती, भंपक अभिनय आणि निकृष्ट दर्जाचे संवाद यांनी नागिन ही मालिका भरलेली आहे. मौनी रॉय आणि सुधाचंद्रन ही मोठी नावंही या मालिकेला तारु शकली नाहीत.