संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणारा शाहिद कपूर पहिल्यांदाच अशा वेगळ्या रूपात दिसत आहे. एका प्रख्यात आणि शूर भारतीय राजपूत राजाची भूमिका रंगवताना शाहिद कपूर या लूकमध्ये राजपूत राजाच्या शाही रूपात साजेसा दिसतोय.
वाचा : कुलदीप यादवला ‘या’ अभिनेत्रीसोबत निर्जन बेटावर ‘डेट’वर जाण्याची इच्छा
दिल्लीच्या डिझायनर रिंपल आणि हरप्रीत नरूला यांनी शाहिद कपूरचा हा राजेशाही लूक डिझाइन केलाय. त्यासाठी राजस्थानच्या ऑरगॅनिक फॅब्रिकवर २२ स्थानिक कारागिरांनी बुद्देदारी वर्क केलेय. तसेच, महारावल रतन सिंहच्या या लूकसाठी चार महिने कसून मेहनत करून घेण्यात आली. या शाही कपड्यांवर तपशीलवार काम झालेले दिसून येत आहे. शाहिदच्या या कपड्यांमध्ये राजस्थानी पारंपरिक रंगांचा वापर तर झालेलाच आहे. त्याचप्रमाणेच महारावल रतन सिंहचा शाही आणि मर्दानी अंदाजही दाखवण्यासाठी बारकाईने काम करण्यात आलंय.
वाचा : 29 years of Ashi Hi Banwa Banwi : ‘लिंबू कलरची साडी… २९ वर्ष झाली अजूनही रंग फिका पडला नाही’
वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनचा ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबर २०१७ ला सर्वत्र प्रदर्शित होईल.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.