‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरूमीत राम रहिमला २५ ऑगस्ट रोजी बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. आश्रमातील दोन साध्वींच्या बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आता राम रहिमचे हेच आयुष्य आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

वाचा : पूर्वाश्रमीच्या प्रियकरांबद्दल बिपाशा म्हणते…

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहिमच्या वादग्रस्त आयुष्यावर येणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांच्या नावांवरही शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. रजा मुराद हे राम रहिमच्या तर आयटम साँगसाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत हनीप्रीतच्या भूमिकेत दिसेल. हनीप्रीत ही राम रहिमची दत्तक मुलगी असल्याचे सांगितले जाते. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी २५ ऑगस्टला हिंसाचार माजवला त्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. तसेच ५० पेक्षा जास्त पोलीसही जखमी झाले. त्या दिवसापासून हनीप्रीत फरार आहे. त्यामुळे पोलीस आता हनीप्रीतच्या मुसक्या आवळण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत.

रॉकस्टार होण्यापासून ते तुरुंगात जाण्यापर्यंतचा राम रहिमचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे कळते. दिल्लीमध्ये मंगळवारपासून चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, एजाज खान तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. आशुतोष मिश्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

वाचा : … या मेकअपमागे दडलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

राम रहिम आणि हनीप्रीतला अभिनयासह स्टेज परफॉर्मन्सचीसुद्धा आवड होती. आपली हीच आवड पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली. ‘मेसेंजर ऑफ गॉड’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या कथेपासून दिग्दर्शनापर्यंत सर्व काम राम रहिमने स्वतःच केले. त्याच्या प्रत्येक कामात हनीप्रीत त्याला सहकार्य करायची.