मेकअपची करामत आपल्याला ‘धूम २’, ‘राबता’, ‘फॅन’, ‘पा’, ‘दशावतार’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रॉस्थेटिक मेकअपमुळे एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला ओळखणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. त्यानंतर आता या अभिनेत्रीचेच घ्या ना, प्रॉस्थेटिक मेकअपमागे दडलेला चेहरा कोणत्या अभिनेत्रीचा आहे ते तुम्ही ओळखू शकता का? नाही ना. मग आम्ही तुम्हाला सांगतो. ही अभिनेत्री आहे बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ म्हणजेच सनी लिओनी.

वाचा : महिलाप्रधान चित्रपटाविषयीच्या फोटोत एकही महिला नाही? नेटिझन्सचा बिग बींना सवाल

सनीने प्रॉस्थेटिक मेकअपमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सनी तिच्या आगामी चित्रपटासाठी प्रॉस्थेटिक मेकअपची मदत घेतेय. हा मेकअप करण्यासाठी कधी कधी चार ते पाच तास किंवा त्याहूनही अधिक वेळ लागतो. दरम्यान, या फोटोंमध्ये सनीला ओळखणंही कठीण असून, तिचे चाहते मात्र ही अभिनेत्री कोणत्या चित्रपटाची तयारी करतेय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

‘तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये मी दिसणार आहे. माझ्या आगामी दमदार चित्रपटासाठी मी प्रॉस्थेटिक मेकअप करतेय,’ असे कॅप्शन सनीने एका फोटोला दिलेय. दुसऱ्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर कपड्याची पट्टी गुंडाळल्याचे दिसते.

वाचा : श्रद्धा कपूर आणि ‘हसीना पारकर’च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

लवकरच सनी आणि अरबाज खानचा ‘तेरा इंतजार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ती ‘बादशाहो’मध्ये इम्रान हाश्मीसोबत थिरकताना दिसली. दरम्यान, संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ चित्रपटातही तिचा एक डान्स नंबर आहे.