सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, झरीन खान, डेसी शाह…. यासारख्या कित्येक अभिनेत्रींना बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याने चित्रपटसृष्टीत आणले. आता हा ‘दबंग’ अभिनेता कोणा अभिनेत्रीला लाँच करणार नसून, त्याची बहिण अर्पिता शर्मा खान हिचा नवरा आयुष शर्मा याला बॉलिवूडमध्ये आणण्याच्या बेतात आहे. पण, आपल्या जिजूसाठी अभिनेत्री शोधणे सलमानला कठीण जात असल्याचे दिसतेय.

वाचा : प्रभासचा चित्रपट अडकला कायद्याच्या कचाट्यात

सुत्रांच्या माहितीनुसार, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉयला मुख्य भूमिकेसाठी घेण्याचा सलमानचा विचार आहे. मात्र त्याच्या निर्णयाने आयुष काही खूश नाही. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयुषला आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीसह किंवा नव्या चेहऱ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. ही नवअभिनेत्रीसुद्धा एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीची मुलगी किंवा बहिण असावी, असे त्याचे मत आहे. असे असले तरी सलमान त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते.

सलमानच्या होम प्रॉडक्शन आधी करण जोहरच्या चित्रपटातून आयुषला लाँच करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव असे होऊ शकले नाही. त्यानंतर कतरिनाच्या बहिणीसोबत तो काम करणार असल्याचे म्हटले गेले. पण, हीसुद्धा केवळ चर्चाच होती. त्यानंतर त्याच्या चित्रपटाविषयी कोणतेच वृत्त आले नाही.

वाचा : सुशांत तिला म्हणतो, ‘तू मला लग्नासाठी आधी का नाही विचारलं’

‘दबंग’मधील सोनाक्षी सिन्हाप्रमाणेच मौनीसुद्धा साडीमध्ये खुलून दिसते, असे सलमानला वाटते. त्यामुळेच त्याने मौनीची चित्रपटासाठी निवड केली होती. दरम्यान, ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मौनी सज्ज झाली आहे. या चित्रपटात ती खिलाडी अक्षय कुमारसोबत काम करतेय.