‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील कलाकारांच्या नावांची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रटाविषयी उत्सुकता पाहावयास मिळतेय. बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन आणि ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमिर खान हे दोन हरहुन्नरी अभिनेते पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांचे लूक जाणून घेण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा : PHOTOS अमिताभ बच्चन यांच्या लूकमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
three khans conspired to get actors like Fawad Khan banned in India
फवाद खानसारख्या कलाकारांवर बंदी घालण्यासाठी कट रचला, पाकिस्तानी अभिनेत्रीचे तिन्ही खानवर गंभीर आरोप
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…

सध्या माल्टामध्ये चित्रीकरण करत असलेल्या बिग बींचा लूक थेट सेटवरूनच लीक झाला. या फोटोत ते एका योद्ध्याच्या अवतारात दिसतात. डोक्यावर पगडी, पाठीवर तलवार असलेला त्यांचा हा ‘अँग्री लूक’ चित्रपटाविषयी आणखीनच उत्सुकता वाढवत आहे. त्यांच्या लूककडे पारखून पाहिल्यास तो ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील ‘द हॉबिट’ या पात्रापासून प्रेरित असल्याचे दिसते.

वाचा : ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळवणाऱ्या प्रियांकाचे उत्पन्न माहितीये का?

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील आमिरचा लूक लीक झाला होता. त्यावर नाराज झालेल्या आमिरने सेटवरील सुरक्षायंत्रणेत वाढ केल्याचे वृत्त होते. ‘धूम’ चित्रपटाच्या सीरिजसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’चे दिग्दर्शन करत असून, या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जात आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर अमिताभ आणि आमिर यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येईल.