कोपर्डीतील घटना अतिशय घृणास्पद आणि चीड आणणारी होती. यापूर्वीही बलात्कारासारखे अक्षम्य गुन्हे करणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली गेली होती. त्यामुळे जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या दोषींना न्यायालयाने कोणतीही सहानुभूती दाखवू नये असे शरद पोंक्षे म्हणाले. तसेच या प्रकरणात कोणीही अल्पवयीन नसल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे, असे अभिनेते शदर पोंक्षे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हटले.

‘दहशतवादाला जसा धर्म नसतो, तसेच बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांनाही कोणताही धर्म आणि जात नसते. जातीच्या आधारे कोणत्याच गुन्ह्याचे समर्थन करता येऊ शकत नाही. राक्षसांना कोणतीही जात नसते, ते बलात्कारी आहेत, त्यामुळे त्यांना फाशीही झालीच पाहिजे, असे पोंक्षे यांनी सांगितले. मुळात कोणत्याच गोष्टीत जात- धर्म आणता कामा नये असे माझे मत आहे. मात्र, अनेकांना मानवतेचे, जातीचे पुळके येतात. कुत्र्यांना मारू नका हा जरी नियम असला तरी पिसाळलेल्या कुत्र्यांना ठारच मारायचं असतं. त्याला सांभाळता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायलाच पाहिजे: शरद पोंक्षे

संसदीय समिती ‘पद्मावती’चा तिढा सोडवणार?

आर्ची होणार ‘प्लास्टिक बंद’ अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर?

दिलीप कुमार न्युमोनियाने आजारी

कोणीतरी साखरपुड्याविषयीचा प्रश्न विचारावा अशी माझी अपेक्षा होती- मानुषी छिल्लर

‘अक्षय हे योग्य नाही’, बिग बींनी खिलाडी कुमारला रोखले

‘मी काय पाप केलंय?’, कपिल शर्माचा सवाल

आता नर्गिस फाख्री आणि उदय चोप्रा चढणार लग्नाच्या बोहल्यावर?

अमिताभ यांच्या ‘रंग बरसे’ गाण्यावर थिरकल्या रेखा

जानेवारी महिन्यापासून राजकारणात सुरु होणार ‘रजनी’पर्व?