बॉलिवूडच्या अभिनेत्री या नेहमीच त्यांच्या स्टाइलमुळे सामान्यांनाही ‘फॅशन गोल्स’ देत असतात. पण, शहेनशहा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हीसुद्धा बी-टाऊनच्या ‘स्टाइल दीवां’ना फॅशनमध्ये टक्कर देत आहे. नुकतीच श्वेताने तिचा जवळचा मित्र करण जोहर आणि अभिनेत्री नेहा धुपिया यांच्यासह ‘वोग बीएफएफ’च्या सेटवर हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : प्रियांकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ऑगस्ट महिन्यातील ‘वोग’ मासिकावर झळकलेल्या श्वेताने क्वचितच तिच्या फॅशन सेन्सने निराशा केली असेल. यावेळीही तिने आपल्या फॅशनने सर्वांची मनं जिंकली. श्वेताने ‘गुसी’ ब्रॅण्डचा किरमिजी आणि निळ्या रंगाचा रॉम्बस प्रिन्टेड स्कर्ट त्यावर ‘अल्तुझारा’चे काळ्या रंगाचे डबल ब्रेस्टेड जॅकेट घातले होते. तिच्या फॅशनचे संपूर्ण श्रेय स्टायलिस्ट अनायता श्रॉफ अदजानिया हिला जाते. श्वेताचा लूक पूर्ण करण्यासाठी अनायताने तिला हातात बरेचसे ब्रेसलेट्स, बारीक पट्ट्याचे घड्याळ आणि पायात ‘जिम्मी चू’ ब्रॅण्डचे ओपन टो बूट्स घालण्यास दिले होते.

वाचा : 2.0 poster घाबरलात ना, घाबरायलाच पाहिजे!

दिसायला अगदी सोबर वाटणाऱ्या या लूकसाठी करण्यात आलेला खर्च ऐकून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. श्वेताने घातलेल्या सिल्क स्कर्टची किंमत तब्बल दीड लाख रुपये तर ब्लेझरची किंमत एक लाख साठ हजार रुपये इतकी आहे. याचाच अर्थ तिच्या लूकची किंमत तीन लाखांपेक्षाही जास्त आहे. तरी यात तिच्या बूट्सच्या किंमतीचा समावेश केलेला नाही. तिच्या संपूर्ण लूकचा विचार केला तर त्याचा खर्च जवळपास चार लाखांच्यावर जाऊ शकतो. मग काय, चर्चा तर होणारच ना..